प्रतिनिधी , अमरावती : कर्ज काढून देतो म्हणून दलाला मार्फत एका वृद्धाचे बँक खात्याचे चेकबुक व एटीएमम स्वतः जवळ ठेवून संगणमताने त्यांच्या खात्यातून 6 लाख 85 हजार 999 रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना अमरावती शहरातील इरविन चौकातील इंडसइंड बॅंकेत घडली. खरैया नगर येथील हरिश्चंद्र वानखडे या 74 वर्षीय वृद्धाचे घराचे सगळे कागदपत्रे घेऊन त्यावर सहा लाख 85 हजार याची लोन केस बँकेचा एजंट प्रवीण उके यांनी मंजूर केली व हे सगळे पैसे प्रवीण उके बँकेतील लिपिक निकिता साबळे व बँक व्यवस्थापक पटेल या तिघांनी संगनमताने हडप केली.अखेर सामाजिक कार्यकर्ते अमोल इंगळे,मनोज व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
या प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी आरोपी बँक व्यवस्थापक,बँक लिपिक निकिता साबळे व एजंट प्रविण ऊके या तिघाविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे,
आरोपींना अटक करण्यासाठी पोलिस पथक पाठवले आहे.
इंडसइड बँकेच्या
