प्रतिनिधि , पंढरपुर : गुरुवारी रात्री सात वाजता आपली ड्युटी संपवून आपल्या गावी जात असताना रस्त्यामध्ये चार जणांच्या टोळक्याने या महिलेवर तलवारीने हल्ला केल्याचा आरोप संबंधित महिला पोलीस कर्मचाऱ्याने केला आहे. रेश्मा शिवाजी सुतार असे महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे . ंबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर सदर महिला पोलीस कर्मचार्याने छेडछाडीचा व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. याचा राग मनात धरून हा हल्ला केल्याचा आरोप रेशमा सुतार यांनी केलाय. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर विनयभंगाचा भा द वि 354 नुसार गुन्हा दाखल आहे. न्यायालयाने अद्याप यात पोलीस कर्मचाऱ्यास जामीन दिला नाही . तरी देखील हा हल्लेखोर पोलीस कर्मचारी कार्यरत असल्याची धक्कादायक बाब पुढे आली .
