जनतेज न्युज

महाराष्ट्रात 5500 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे-केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी

प्रतिनिधी , मुंबईः महाराष्ट्रात 5500 कोटींच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातील मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामाविषयी माहिती दिली. राज्यात 5500 कोटींची कामे महाराष्ट्रात मंजूर झाली आहेत, अशी माहिती नितीन गडकरींनी दिलीय.

57 हजार कोटी रुपये महामार्गासाठी खर्च करण्यात आलाय.1800 कोटी रुपयांची सीआरएफही लवकरच देणार असल्याचंही गडकरींनी सांगितलंय. गेल्या मार्च महिन्यात राष्ट्रीय महामार्गबाबत आढावा घेतला आहे, आता मोठ्या गॅप नंतर आता पुन्हा एकदा आढावा घेतल्याचंही गडकरींनी सांगितलंय. सध्या 523 प्रकल्प राज्यात सुरू असून, एकूण14,409 किमी मार्गाचे एक लाख 37 लाख कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. आज 5 हजार 500 कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत. दोन्ही पालखी मार्गमध्ये 3 PKG चे काम सुरू झालेत, 5 PKG चे काम सुरू होणार असून, उर्वरित काम लवकरच मार्गी लावू, असं आश्वासनही गडकरींनी दिलंय.

पुणे चांदणी चौकबाबत अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहे. सुरत-नाशिक-अहमदनगर-सोलापूर-हैदराबाद-चेन्नई असा मार्ग करत आहोत. यामुळे उत्तर दक्षिण वाहतूक वेगवान होणार असल्याचंही नितीन गडकरींनी अधोरेखित केलंय. नागपूर-हैदराबाद महामार्ग बांधत आहोत. एक वर्षाच्या आत मुंबई गोवा मार्ग रूंदीकरणचे काम पूर्ण होईल, असंही गडकरी म्हणालेत.