जनतेज न्युज

मिठाई चोरी करणाऱ्या झुरळ्याला अटक झुरळ्या तडीपार गुंड घरफोडीचे 15 गुन्हे दाखल

प्रतिनिधी , पुणे : दुकानाचे शटर उचकटून चोरी करणार्या तडीपार गुंडाला समर्थ पोलिसांनी 24 तासात जेरबंद केलंय ,त्याच्याकडून 46 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे .आकाश उर्फ झुरळया पाटोळे असे अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारच नाव आहे. पाटोळे हा तडीपार असून त्याच्यावर खडक व समर्थ पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचे 15 गुन्हे दाखल आहेत. 15 तारखेला सकाळी 6 वाजता भवानी पेठेतील मंगलम ड्रायफूट या दुकानांचे शटर उचकटून त्याने दुकानातून 48 हजार रुपये रोख रक्कम व मिठाई चोरली होती या प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी झुरळयाचा शोध घेतला पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलिसांनी 24 तासात आरोपीला अटक केली आहे .पैसे आणि मिठाई चोरणाऱ्या झुरळंयाला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे