प्रतिनिधी , सांगली : दीपावलीच्या आणि पाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीच्या विष्णू आण्णा फळ मार्केट मध्ये साऊथ आफ्रिका हुन आंब्याची आवक झाली आहे… तर या आंब्याचा दर 2 हजार ते 2200 रुपये इतका दर मिळत आहे..
सांगलीच्या विष्णू आण्णा फळ मार्केट मध्ये परदेशातून आंब्याची आवक झाली आहे.. 40 पेट्या आंब्याची आवक झाली आहे… तर 20 पेट्या ची विक्री सुद्धा झाली आहे.. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर सांगली कर या आंब्याची चव चाखण्यासाठी मार्केट मध्ये गर्दी करू लागले आहेत.. हा आंबा गेले तीन वर्षे सांगली फळ मार्केट मध्ये येत आहे.. या आंब्याची चव रत्नागिरी आंब्या सारखी असल्याने ग्राहक आंबा खरेदी करत आहेत…
