प्रतिनिधी , सांगली : मिरज कर्नाटक सीमा भागातून गुटखा व सुंगांधी तंबाखूची तस्करी मोठ्या प्रमाणात होत आहे ,याचे कनेक्शन सांगली येथील मार्केट यार्ड असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. आरग बेडग मार्गावर अवैध गुटखा व सुगंधी तंबाखू वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिरज ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार मिरज ग्रामीण प्रभारी परी अधीक्षक आदित्य मिरखेलकर व त्याच्या पथकाने वाहनाचा पाठलाग करून सांगली मार्केट यार्ड येथील नरेश नानवाणी यांच्या गोडाऊन मध्ये वाहन गेल्यानंतर छापा मारला. वाहन व गोडाऊन मध्ये गुटखा ,सुंगांधी तंबाखू साठा आढळून आल्यानंतर नरेश नानवाणी व वाहन चालकाला पोलिसांनी अटक केली आहे .याठिकाणी 22 लाखाचा गुटखा व सुगंधी तंबाखू साठा पथकाने जप्त केला आहे हा अवैध गुटखा महेश नानवाणी नरेश नानवाणी यांचा असून याची माहिती IPS आदित्य मिरखेलकर यांनी दिली आहे .
