लोकल आणि मंदिरं सुरू करण्याबाबत दिवाळीनंतर सकारात्मक निर्णय.
तेजस्विचे कर्तृत्व मोठं त्यांचं मनापासून अभिनंदन – आरोग्य मंत्री राजेश टोपे
प्रतिनिधी , मुंबई : मुंबई महापालिकेने ज्याप्रमाणे मेडीकल कॉलेज -हॉस्पिटलची उभारणी केली. त्या धर्तीवर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातही मेडीकल कॉलेज-हॉस्पिटल उभारण्यासाठी चालना दिली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील कोरोना उपाययोजना आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी टोपे आज कल्याणात आले होते. यावेळी त्यांनी कोरोना काळात केलेल्या कामाबाबत केडीएमसीला कौतुकाची थापही दिली.
व्हीओ : कल्याण डोंबिवलीमध्ये रुग्णालयासाठी आरक्षित भूखंडांवर पीपीपी तत्वावर मेडीकल कॉलेज आणि 500 बेडचे रुग्णालय उभे करण्यासाठी आरोग्य आणि नगरविकास विभाग पूर्ण मदत करणार. तर 100 वर्षांनी येणाऱ्या साथीच्या आजार लक्षात घेऊन ठाणे परिसरात साथीच्या रोगांचे हॉस्पिटल उभारण्यात येणार असल्याचेही आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. तर कोरोना पूर्वी शहरी भागात आरोग्य व्यवस्थेकडे झालेले दुर्लक्ष लक्षात घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच शहरी भागासाठी स्वतंत्र संचालनालयाची निर्मिती करण्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये घेण्यात आल्याचेही ते म्हणाले. तर हॉटस्पॉट बनलेल्या केडीएमसीने अत्यंत परिणामकारकपणे उपाययोजना राबवल्याने कोरोना नियंत्रणात आल्याचे गौरवोद्गारही त्यांनी यावेळी काढले. दिवसाला 900 रुग्ण जरी सापडले तरी त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार करता येईल अशी आरोग्य यंत्रणा केडीएमसीने उभारल्याचे सांगत महापालिकेच्या कामाचे कौतुक केले. तर याठिकाणी तातडीने कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी देण्यासह इथल्या रुग्णालयात फिजिशियन देण्याबाबतही लवकरच मदत केली जाईल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.तसेच आज राष्ट्रवादी च्या जिल्हा ध्यक्ष पदाच्या निवडीच्या संदर्भांत चर्चा करण्यासाठी आज आलेलो आहोत कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकून याबाबतचा अहवाल वरिष्ठांना देणार असल्याचे सांगितले .तर स्वबळावर लढन्याबाबत प्रश्नाला उत्तर देताना पक्ष श्रेष्ठी ठरवतील तो निर्णय घेऊ असे संगीतले
लोकल आणि मंदिरं सुरू करण्याबाबत दिवाळीनंतर सकारात्मक निर्णय.
दिवाळीनंतर मंदिरं आणि लोकल सुरू करण्याबाबत सोशल डिस्टन्स चे कसे करता येईल याबाबत टास्क फोर्सचे नियोजन सुरू असून दिवाळी नंतर सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे सांगितले
तेजस्विचे कर्तृत्व मोठं ,त्यांचं मनापासून अभिनंदन – आरोग्य मंत्री राजेश टोपे
यावेळी बोलताना बिहारच्या निवडणुकीबाबत बोलताना टोपे यांनी तेथील लोकांची सरकारबाबत नाराजि आहे हे लक्षात येत आहे .लालु यादव जेल मध्ये असताना तेजस्वि या एका तरुण मुलांने एकाकी लढत दिली त्याच कर्तृत्व मोठं आहे असे सांगत त्याचे अभिनंदन केले
