कल्याणच्या फुल मार्केटमध्ये व्यावसायिकांची अनोखी शक्कल…
प्रतिनिधी , कल्याण: आधीच पावसाने झालेले नुकसान आणि त्यात कोरोनामुळे बसलेली महागाईची फोडणी या दोन्हीच्या चक्रात सध्या शेतकरी आणि छोटे छोटे दुकानदार भरडले गेले आहेत. त्यातून फुलांचा व्यवसायही सुटलेला नसून भाववाढीच्या गर्मीवर फुल विक्रेत्यांकडून चक्क बर्फाचा उतारा शोधण्यात आला आहे.
व्हीओ : मुंबईच्या दादर मार्केटनंतर कल्याणातील फुल मार्केटमध्ये ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळत असतो. मात्र यंदाच्या वर्षी आधी कोरोना आणि त्यानंतर मग अतिवृष्टीमुळे सर्वच क्षेत्रात महागाईने उच्चाक गाठला आहे. त्यातही फुलांसारख्या नाशवंत उत्पादनांची आणि त्याचा व्यवसाय करणाऱ्यांची तर अजूनच बिकट परिस्थिती. सणासुदीच्या तोंडावर दरवर्षीच दरवाढ होत असते. मात्र यंदाचे वर्ष कोरोनामुळे अत्यंत खडतर बनले असून फुलांचे दर गगनाला भिडले आहेत.
नंतर भाव वाढल्यावर फुलं विकत घेणे आणि अशा महागड्या फुलांचे हार विकणे परवडणारे नसल्याने कल्याणच्या फुल मार्केटमधील विक्रेत्यांनी आता हार बनवून ते बर्फाच्या भल्यामोठ्या पिशवीत ठेवण्यास सुरुवात केली आहे. बर्फ असल्याने हे बनवलेले हारही एरव्हीपेक्षा जास्त काळ टिकतात. तसेच हे तयार हार आम्ही नसिक, पुणे, ठाणे, मुंबई, धुळे आदी ठिकाणी पाठवत असल्याचे या विक्रेत्यानी सांगितले.
