जनतेज न्युज

महावितरणच्या अभियंत्याला आमदार देवेंद्र भुयार यांची धमकी तुमच्यासह कार्यालयाला जाळून टाकू -देवेंद्र भुयार

प्रतिनिधी , मोर्शी: वरूड मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार हे शेतकऱ्यांच्या वीज प्रश्नी चांगलेच आक्रमक झाले आहे. चार दिवसात वरूड मोर्शी तालुक्यातील शेकडो नादुरुस्त रोहित्रे, सिंगल फेज लाईन सुरू न झाल्यास तुमच्या कार्यालयासोबत तुम्हालाही जाळून टाकू, असा धमकीवजा इशारा भुयार यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना दिला आहे.
वीज प्रश्नी आमदार भुयार आक्रमकवरूड मोर्शी तालुक्यामध्ये सतत वीज पुरवठा बंद असतो. त्यामुळे, शेतकऱ्यांना त्रास होत आहे. याबाबीची दखल घेत भुयार यांनी वरूड मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या समस्या तक्रारी तत्काळ सोडवण्याकरिता थेट महावितरण अधीक्षक अभियंता संजय खाणंदे यांच्या कार्यालयात ठिय्या मांडला.