जनतेज न्युज

सांगलीच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर महापालिका आणि खेळाडूंची स्वच्छता मोहीम …

12 टन गवत केला गोळा: खेळाडूंनी केला स्टेडियमचा परिसर चकाचक : महापालिका आयुक्तांच्या आवाहनाला खेळाडूंचा प्रतिसाद
प्रतिनिधी ,सांगली: सांगलीच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमवर सांगली महापालिका आणि खेळाडूंनी स्वच्छता मोहीम घेतली . यामध्ये क्रीडांगनावरील 12 टन गाजरीगवत खेळाडूनी गोळा केले. तसेच खेळाडूंनी स्टेडियमचा परिसर चकाचक केला. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जवळजवळ 1 हजार खेळाडूंनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.
लॉगडाऊन काळात क्रीडांगणे बंद असल्यामुळे सांगलीच्या छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या परिसरामध्ये गाजर गवत आणि कचरा निर्माण झाला होता. यामुळे खेळाडूंना प्रॅक्टिस करताना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत होते. याची दखल घेत मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी छत्रपती शिवाजी क्रीडांगनातील गवत आणि अन्य कचरा काढणेसाठी स्वच्छता मोहीम घेणेच्या सूचना प्रशासनाला केल्या होत्या. त्यानुसार आज स्वच्छ सर्व्हेक्षण 2021 अंतर्गत उपायुक्त राहुल रोकडे आणि आरोग्य टीमकडून क्रीडांगणावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये सर्व खेळ प्रकाराचे 1 हजार खेळाडू सहभागी झाले होते. या तीन तासाच्या स्वच्छता मोहिमेत 13 टन गवत आणि अन्य कचरा गोळा करण्यात आला आहे. या मोहिमेत क्रीडा प्रशिक्षक आणि शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त बापू समलेवाले, युवराज खटके, प्रा. एस एल पाटील, क्रिकेटचे प्रशिक्षक विष्णू शिंदे, प्रकाश फाळके, शिरीष रहाटे, अक्षय पाटील, चेतन पडियार, मनपाचे क्रीडाधिकारी महेश पाटील, तायक्वांदोचे चौगुले सर, खोखोचे प्रशांत पवार, वरिष्ठ स्वछता निरीक्षक अविनाश पाटणकर, स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी, बंडा जोशी, पंकज गोंधळे, सामाजिक कार्यकर्ते अमर निंबाळकर, इमरान शेख यांनी सहभाग घेत स्वच्छता केली. यावेळी मुख्य ग्राउंडसह मुख्य इमारत तसेच बैठक गॅलरीची सुद्धा स्वच्छता यावेळी करण्यात आली.