प्रतिनिधी, मुंबई : दुर्गा चंद्रेश्वर जाधव. वय वर्षे 50 ही महिला सकाळी चांदवड येथील रेणुका देवी या मंदिरातून देवीची पूजा करून तिच्या घरी वडबारे येथे जात असताना.
मुंबई आग्रा महामार्गावरून मालेगाव बाजूकडून नाशिक बाजूकडे जाणारी अज्ञात चारचाकी गाडीतून एका व्यक्तीने हात बाहेर काढून. पायी जात असलेली महिला. या महिलेच्या गळ्यातील बॅग ओढून नाशिक बाजूकडे फरार झाले .तर गळ्यातील सोनसाखळी चोराच्या हातात लागण्यास सुदैवाने निष्फल आले आहे.त्यात महिलेच्या साडीचा पदर हा त्या गाडीच्या बाजूला अडकल्यामुळे ती महिला जागेवर बेशुद्ध पडली. तिच्या तोंडाला हाताला व उजव्या पायाला जबर मार लागल्याने ती जखमी झाली असता. तेथील नागरिकांनी तिला उचलून 108 रुग्णवाहिकेने चांदवड येथे औषध उपचारासाठी दाखल केले आहे. तर त्या ठिकाणी डॉक्टर व त्यांच्या स्टॉप यांनी औषध उपचार केले असून.
तर तिचा उजवा पाय फ्रॅक्चर झाला आहे .या संदर्भात जखमी अवस्थेत असलेली महिला दुर्गा चंद्रेश्वर जाधव हिने झालेला प्रकार पत्रकारासमोर मांडला. व ती आज चांदवड उपजिल्हा रुग्णालयात औषध उपचार घेत आहे.
