जनतेज न्युज

अमली पदार्थ विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दलाने काढली शहरातून सायकल रॅली

प्रतिनिधी, धुळे : अमली पदार्थ विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पंधरवाडा आयोजित करण्यात येत आहे. यानिमित्त शहरात विविध जनजागृती वर उपक्रम राबविण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून आज धुळे शहरातून सायकल रॅली काढत. अमली पदार्थ यावर जनजागृती करण्यात आली. धुळे शहराच्या विविध भागातून निघालेल्या या रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. या रॅलीत धुळे जिल्हा पोलीस दलातील अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच शहरातील विविध सायकलिस्ट ग्रुप देखील यात सहभागी झाले होते. धुळे शहराच्या विविध भागातून तब्बल 12 किलोमीटर पर्यंत ही सायकल रॅली काढण्यात आली. अमली पदार्थांमुळे निर्माण होणारे दुष्परिणाम, सामाजिक प्रश्न तसेच आरोग्याचे प्रश्न याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने ही रॅली काढण्यात आल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी माध्यमांशी बोलताना दिली.