जनतेज न्युज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कणा नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले – प्रकाश आंबेडकर

प्रतिनिधी , मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. राज्यपालांना भेटून त्यांनी सध्या महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती विषयी चर्चा केली तसेच सभाग्रह बरखास्त न करता हे सरकार बरखास्त करण्याची मागणी सुद्धा केली. माध्यमांशी प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कणा नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तसेच संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, संजय राऊत यांनी लिहून बोलण्यापेक्षा वाचून बोलण्याची गरज आहे. तसेत राज्यपाल यांनी पाठपुरवठा न केल्यास या प्रकरणात चौथा पक्षाचा सुद्धा सहभाग असण्याची शक्यता वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.