प्रतिनिधी , पुणे : फिल्मी स्टाईलने पाठला करून नाशिक रेल्वे स्टेशनवर दरोडा टाकणाऱ्या टोळीला पोलिसांनी जेरबंद केले.
रंजितकुमार दास, सुशिल कामत आणि शैलेंद्रकुमार मंडल अशी अटक करण्यात आलेली आरोपीची नाव आहेत. सदर टोळीने 17 मार्चला 2021 ला महाळूनगे एम आय डी सी परिसरात ट्रक ड्रायव्हरला मारहाण करून सामान भरलेला ट्रक पळवून नेला होता. सदर टोळी नाशिक मार्गे बिहारला पळून जात असताना. नाशिक रेल्वे स्टेशन परिसरात पिंपरी चिंचवड पोलिसांनी दरोडा टाकणाऱ्या टोळीला अटक केली आहे. सदर टोळी कडून 19 लाख 99 हजार 405 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
