जनतेज न्युज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेच्या अनुषंगाने वाहतूक पोलिसांकडून मोठी व्यवस्था

प्रतिनिधी, औरंगाबाद : आज बुधवार आठ जून रोजी औरंगाबाद शहरातील मराठवाडा संस्कृतीक मैदानावर ती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सभेचे मोठे आयोजन करण्यात आले आहे,
त्या अनुषंगाने वाहतूक पोलिसांच्या वतीने शहरात कोणत्याही प्रकारच्या वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून मोठे नियोजन आज रोजी औरंगाबाद शहरात करण्यात आले असून यासाठी औरंगाबाद शहरातील कर्णपुरा मैदानात वाहनांची मोठी व्यवस्था करण्यात आली आहे, येथे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्यासह चाळीस कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त करणपुरा मैदानात पोलिसांच्या वतीने लावण्यात आला असून येणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात पार्किंग याठिकाणी करण्यात येत आहे, सभेसाठी वाहनांची मोठी गर्दी या परिसरात दिसून आली असून मराठवाड्याच्या विविध भागातून अनेक वाहनधारक या मैदानात वाहन पार्किंग साठी येत असल्याचे चित्र दिसून येत आहे,
मुख्यमंत्री यांच्या सभेच्या अनुषंगाने वाहतूक शाखेच्या वतीने शहरात वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये या अनुषंगाने मोठी नियोजन करण्यात आले असून त्या नियमांचे शिवसेनेनेही मोठ्या प्रमाणात पालन करतांना दिसून येत असून वाहनांचे नियोजन मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे यासाठी औरंगाबाद शहरातील कर्णपुरा मैदान विवेकानंद महाविद्यालय आणि एमपी लॉ कॉलेज या ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे,
अशी माहिती वाहतूक पोलिसांच्या वतीने सदर माहिती देण्यात आली आहे.