प्रतिनिधी , अमरावती : देहू येथील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारांना भाषण करू दिले नाही. त्यामुळे राष्ट्रवादी आक्रमक झाले असतांना काँग्रेसने देखील यात उडी घेतली आह. ,महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकुर यांनी अमरावतीत यावर संतप्त व आक्रमक भूमिका मांडली. या देशात संविधान आहे की नाही असा थेट सवालच त्यांनी उपस्थित केला, प्रोटोकॉल नुसार अजित पवारांना बोलू द्यायला पाहिजे होत पन तस झालं नाही, प्रत्येक गोष्टीत केंद्र सरकार राजकारणात करत हे अजिबात शोभणार नाही हे चिल्लरगिरी आहे. भारताच्या संस्कृतीला न पटणारं आहे. मोदींनी अजीत पवारांचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा अवमान केला, भाजपने देशाचं वातावरण खराब केलं अशी टीका यशोमती ठाकुर यांनी भाजपवर केली.
