जनतेज न्युज

अधिकृत परवानाधारक विक्री केंद्रावरूनच शेतकऱ्यांनी बी-बियाणे खरेदी करावे- कृषी सहसंचालक रविंद्र भोसले

प्रतिनिधी , नागपूर अधिकृत परवानाधारक विक्री केंद्रावरूनच शेतकऱ्यांनी बी-बियाणे खरेदी करावे आणि पक्की पावती घ्यावी असे आवाहन नागपूर विभागाचे कृषी सहसंचालक रविंद्र भोसले यांनी आज केले. खरीप हंगामाची  पूर्वतयारी नागपूर विभागात करण्यात आलेली असून कापूस, सोयाबीन, भात आणि तूर या बरोबर इतर बियाण्याचे नियोजन देखील  करण्यात आले..युक्रेन-रशिया युद्धाच्या पार्श्वभूमीवर खताचा तुटवडा निर्माण होईल अशी भिती होती पण खताचा साठा देखील 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असे आवाहन देखील त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे. 70 टक्के पेक्षा जास्त उगम क्षमता असलेले बी-बियाणे शेतकऱ्यांनी वापरावे असेही ते म्हणाले. विभाग स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. काळाबाजार होऊ नये यासाठी 70 भरारी पथके देखील तयार करण्यात आलेली आहे. कुठे एच टी बी टी सारखे किंवा बोगस बियाणे विक्री होत असल्यास त्याची माहिती प्रशासनाला द्यावी त्यासाठी तक्रार करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात हेल्पलाईन नंबर सुद्धा देण्यात आले … रासायनिक खतांच्या वापरा ऐवजी जैविक खताचा वापर करावा असे आवाहन देखील त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.