जनतेज न्युज

युवकांनी मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीचे सदस्य व्हावे – निलेश विश्वकर्मा

प्रतिनिधी, नंदुरबार : महाराष्ट्रातील राजकारण सध्या वेगळ्याच वळणावर सुरू आहे .यामुळे युवक व युवतींमध्ये महाराष्ट्रातील राजकारणाबद्दल वेगळा दृष्टिकोन निर्माण झाला आहे त्यामुळे ,युवक-युवतींसाठी महाराष्ट्रात बाळासाहेब आंबेडकर यांनी एक चांगल्या प्रकारचे दालन उभे केले आहे. वंचित बहुजन आघाडीत च्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला न्याय आपण देऊ शकतात म्हणून युवक ,युवतींनी मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीचे सदस्य होऊन पक्षात सहभागी व्हावे  असे आवाहन वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी आज बोलताना केले .

प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांच्या उपस्थितीत आज वंचित बहुजन आघाडी च्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत  शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली .या  बैठकीला वंचित बहुजन आघाडी चे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष व नंदुरबार जिल्हाध्यक्ष अरुण रामराजे नाना ठाकरे,  युवक जिल्हाद्यक्ष सुनील सूर्यवंशी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष श्री निलेश विश्वकर्मा यांनी सांगितले की वंचित बहुजन आघाडीचे नंदुरबार जिल्ह्यात जे काम सुरू आहे ते अतिशय उल्लेखनीय आहे भविष्यात मोठ्या प्रमाणात युवकांचे संघटन वंचित बहुजन आघाडीचे नंदुरबार जिल्ह्यात उभे असताना आपल्यास दिसेल.  संपूर्ण महाराष्ट्रात आमचे दौरे सुरु आहेत युवकांना मोठ्या प्रमाणात वंचित मध्ये  सहभागी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत .सध्या महाराष्ट्राचे राजकारण सुरू आहे ते सत्तेपासून पैसा व पैशापासून सत्ता अशा प्रकारचे सुरू आहे ,यामुळे महाराष्ट्रातील तरुण तरुणी भरकटले आहे .तरुणांच्या मनात महाराष्ट्राचा राजकारणाबद्दल वेगळा दृष्टिकोन निर्माण झाला आहे महाराष्ट्राचा राजकारणाचा  कचरा साफ करण्यासाठी 18 ते 35 वयोगटातील सर्व  युवक-युवतींनी वंचित बहुजन आघाडीचे सदस्य व्हावे. यावेळी पुढे बोलताना श्री विश्वकर्मा यांनी सांगितले की वंचित बहुजन आघाडीचा हा महाराष्ट्र दौरा सोलापूर पासून सुरू झाला असून मराठवाडा, विदर्भ ,उत्तर महाराष्ट्र , व आता खानदेश मध्ये सुरू आहे .संपूर्ण महाराष्ट्रात हा दौरा बाळासाहेबांचा नेतृत्वाखाली होणार असून युवक-युवतींना वंचित आघाडी मध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत ….