प्रतिनिधी, नवी मुंबईत : युक्रेन आणि रशियात युद्ध सुरू झाल्यावर आम्हाला भारतात परत येण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने योग्य वेळी काहीच मदत झाली नाही,आम्हाला युध्दाची सूचना करण्यात आली होती,मात्र ज्या ठिकाणी आम्ही राहत होतो,त्या ठिकाणापासून विमानतळ खूप अंतरावर होते,आम्ही विमानतळा पर्यंत पोहचणे हेच अधिक जिकरीचे होते,कारण त्यावेळी आमचा जीव ही जाऊ शकत होता.मात्र त्यावेळी भारतीय दूतावासाने आम्ही संपर्क करूनही काहीच प्रतिसाद दिला नाही,पाच मिनिटात तिकिटाचे दर वाढत होते,लखांच्या वर दर झाले होते जे आम्हाला परवडणारे नव्हते,मात्र अशावेळी जी मदत हवी होती ती मिळाली नाही,अजूनही माझ्या सोबत असलेले आणि इतर असे खूप विद्यार्थी युक्रेन मध्ये अडकले असून,अजुनही केंद्र सरकारने त्यांची मदत करावी आधी आर्त हाक युक्रेन मधून परत आलेल्या प्रचीती पवार हिने केंद्र सरकारला घातली.
