जनतेज न्युज

युवकास मारहाण करून जखमी करणाऱ्या तीन आरोपींना सदर बाजार पोलिसांनी जेरबंद केलय.

प्रतिनिधी , जालना : जालना येथील युवक आदित्य राज भरत जांगडे यांना तीन अज्ञात इसमांनी पोते उचलण्याच्या आकुर्डी ने मारहाण करून जखमी केली होती. हल्ल्यानंतर करिज्मा गाडीवर हे इसम पळून गेले होते. त्यानंतर जखमी आदित्य यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशन सदर बाजार जालना येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी पोलिस हेडकॉन्स्टेबल परशुराम पवार यांच्याकडे तपास दिला होता. तपासाची चक्रे फिरवून सिंधी काळेगाव येथून तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलय. बाबू उर्फ बब्बू नसीर शेख, युनुस रफिक पठाण, अझर नूर शेख अशी आरोपींची नावे आहेत. पोलीस हेड कॉन्स्टेबल परशुराम पवार यांच्या पथकाने ही कारवाई केलीय.