प्रतिनिधी , नांदेड : नांदेड जिल्ह्यातील मुक्रमाबाद ता.मुखेड येथे कूषीपंप वीज धोरण योजना या सदर्भात मंगळवारी ता.२ फेब्रुवारी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांना कृषीपंप योजनेबद्दल माहीती देण्यात आली.त्यामध्ये शेतकऱ्यांना विज बिलाची शंभर टक्के रक्कमेतील तेहतीस टक्के रक्कम भरुन विज जोडणी करून घेता येते. शेतकऱ्यांना स्वतःच्या स्वखर्च्याच्या माध्यमातुन विज खांब डि.पी.बसवण्यासाठी देखील भुभा या योजनेत देण्यात येत आहे.यासाठी शेतकऱ्यांनी महावितरणास कंपनीस सहकार्य करावे असे आव्हान उपविभागीय उपकार्यकारी अभियंता गारबोटे यांनी केली आहे.
