जनतेज न्युज

धुळे राष्ट्रवादी काँग्रेसने स्वखर्चाने उभारला सेल्फी पॉईट.

प्रतिनिधी , धुळे : आपल्या वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांनी धुळे जिल्ह्यास सुपरिचित असणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले यांनी आपल्या नवीन संकल्पनेतून धुळे शहराच्या सौंदर्यात वाढ व्हावी या उद्देशाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मार्फत स्वखर्चाने सेल्फी पॉईट उभारले आहे.
आज धुळे शहरातील सावकर पुतळा येथे I LOVE DHULE असे Acrylic Word मध्ये लिहीलेल्या शब्दांचे उद्घाटन करण्यात आले आहे. धुळे शहरातील या सुशोभिकरणाचे उद्घाटन धुळे शहरातील राष्ट्रवादीचे प्रमुख पदाधिकारी यांच्या सामूहिक हस्ते करण्यात आले.
येणाऱ्या काळात लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने धुळे शहरामध्ये प्रमुख चार ठिकाणी ” I LOVE DHULE ” , ” I LOVE INDIA ” , ” माझे धुळे ” अशा पध्दतीचे Acrylic Word ( सेल्फी पाँईट ) स्वखर्चाने उभारले जाणार आहे . यामुळे धुळे शहराच्या सौंदर्यात नक्कीच वाढ होईल यात शंका नाही. तसेच धुळे शहरातील प्रत्येक नागरिकाला धुळे शहराचा अभिमान वाटेल अशी प्रतिक्रिया रणजीत राजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलता