जनतेज न्युज

आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यात आरोग्य केंद्र हरवल्याची तक्रार दाखल

प्रतिनिधी , नागपूर : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांच्या जिल्ह्यात, आरोग्य केंद्र हरवल्याची तक्रार दाखल झाली आहे. जालना शहरातील नुतन वसाहत भागातील नागरी आरोग्य केंद्र हरवल्याची तक्रार, जनता पोलीस समन्वय समितीचे जालना सह-समन्वयक ईश्‍वर बिल्होरे यांनी दाखल केली आहे. कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलिस निरिक्षक प्रशांत महाजन यांच्याकडे रितसर लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे.
शहरातील नुतन वसाहत भागातील नागरी आरोग्य केंद्र अनेक वर्षापासून हरवल्याने नुतन वसाहत परिसरात राहणार्‍या नागरीकांना, लहान बालकांना, गरोदर महिलांना प्राथमिक उपचारापासून वंचित रहावे लागत आहे. यामुळे नागरीकांना उपचार घेण्यासाठी खाजगी दवाखान्याकडे जावे लागते. यामुळे शहरात आरोग्य केंद्र हरवले आहे अशी तक्रारच पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. जनता पोलीस समन्वय समितीचे जालना सह-समन्वयक ईश्‍वर बिल्होरे यांनी ही तक्रार दाखल केली आहे.