प्रतिनिधी , हिंदूच्या भावना भडकवणारे वक्तव्य करणाऱ्या शर्जिल उस्मानी याच्या विरोधात पुणे येथे 153A अनुसार FIR दाखल करण्यात आली आहे.सतत पाठपुरावा करून ही FIR दाखल करून घेतल्याने भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रयत्नांना यश आले आहे यासाठी युवा मोर्चा चे प्रदेश सचिव ॲड.प्रदीप गावडे यांनी विशेष पाठपुरावा केला आहे. या माथेफिरू वर गुन्हा दाखल व्हावा यासाठी संपूर्ण राज्यभर युवा मोर्चा ने निदर्शने करून निवेदने दिली होती.सरकारची भूमिका उदासीन असताना सुद्धा भाजयुमो च्या पाठपुराव्यामुळेच हे शक्य होऊ शकले.

