प्रतिनिधी , नागपूर -रस्त्यावर गुंडगिरी करणाऱ्या मुलांनी रस्त्यावरून जाणाऱ्या एका परिवाराच्या गाडीला धडक दिली. यावेळी झालेल्या शाब्दिक भांडणावरून त्या मुलांनी परिवारातील मुलीची छेड काढून त्यांना शिव्या दिल्या. या प्रकरणामुळे परिसरात वातावरण तणावपूर्ण झाले . घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. यात आरोपी राजकिरण राजहंस व राजेश रावते यांना अटक करण्यात आली आहे.
