जनतेज न्युज

जनतेच्या सुरक्षेसाठी आता मुंबई मध्ये मुंबई पोलिसांची सेगवे द्वारे गस्त…

प्रतिनिधी , मुंबई पोलिसांची गस्तीसाठी नवी यंत्रणा सज्ज झाली आहे. वरळी सी फेस वर गस्त घालण्यासाठी मुंबई पोलिसांना सेगवे म्हणजेच स्वयंमसंतुलीत विद्युत स्कूटर देण्यात आली आहे. ही स्कूटर ताशी 20 किमी गतीने धावू शकते. एकदा चार्जिंग केल्यानंतर कमीत कमी 25 किमी ही स्कूटर धावू शकेल. या प्रणालीचे उद्घाटन आज गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते वरळी सी फेस येथे करण्यात आले. याप्रसंगी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, अभिनेता अक्षय कुमार, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह, पोलीस सहआयुक्त विश्वास नागरे पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व अभिनेता अक्षय कुमार यांनी सुद्धा सेगवे वरून वरळी सी फेस वर फेरफटका मारला.