प्रतिनिधी , नगर : राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते सिल्लोड नगर परिषद अंतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी 5 टक्के प्रमाणे पात्र लाभार्त्यांना राखीव निधीचे धनादेश तसेच गरजूंना धान्य वाटप करण्यात आले. शहरातील नगर परिषद इमारती जवळील राम – रहीम व्यापार संकुल समोर हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने दिव्यांगाना धनादेश वाटप तसेच राज्यमंत्री अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने दिव्यांग व गरजूंना धान्य वाटप या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
