प्रतिनिधी , यवतमाळ : अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघात आज निवडणूक पार पडत आहे या निवडणुकीत अमरावती विभागात शिक्षक मतदारसंघात प्रथमच राजकीय पक्ष निवडणुकीत उतरले आहेत
अत्यंत चुरसपूर्ण लढत होत आहे. तर दुसरीकडे शिक्षक मतदारांना आकर्षित करण्यासाठी मटण आणि दारू पार्टी दिल्याचा आरोप होत आहे.
यंदा ची निवडणूक अत्यंत चुरशीची असून या निवडणुकीत स्वतः मतदार नसलेले उमेदवार आणि शिक्षक नसलेले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. त्यामुळे या निवडणुकीला फार महत्व प्राप्त झालं आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षाच्या घुसखोरीला शिक्षक संघटना कशा पद्धतीने या निवडणुकीत उत्तर देतात की राजकीय पक्ष बाजी मारतात हे निवडणूक निकाल नंतर स्पष्ट होईल.
