जनतेज न्युज

धुळे नंदुरबार विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान….

प्रतिनिधी , धुळे : काँग्रेस पक्षाला राम राम ठोकत भाजपात प्रवेश केलेल्या अमरिषभाई पटेल यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा देखिल राजीनामा दिला होता. त्याच जागेसाठी पोटनिवडणुक जाहीर करण्यात आली होती. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती.
धुळे नंदुरबार विधान परिषदेसाठी भाजपा कडून अमरिषभाई पटेल तर काँग्रेस पक्षाकडून अभिजित पाटील उमेदवारी करीत आहेत.
आता पर्यंत सलग दोन वेळा काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर अमरिषभाई पटेल यांनी विजय मिळवला होता. त्यावेळी नंदुरबार जिल्यातील दोन मातब्बर नेते के सी पाडवी आणि चंद्रकांत रघुवंशी पटेलांच्या सोबत होते.यावेळी अमरिषभाई भाजपा तर्फे उमेदवारी करीत आहेत. अशातच पूर्वा श्रमीचे मित्र के सी पाडवी आणि चंद्रकांत रघुवंशी आता विरोधात आहेत तर यापूर्वी विरोधात असणारे आमदार विजयकुमार गावित, खासदार हिना गावित,आमदार जयकुमार रावल अमरिषभाई पटेलांसोबत आहेत. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्व्यांचे लक्ष लागून आहे.
मतदानाला कोरोनाचे सावट असल्याने शिरपूर तहसील कार्यालयात मतदान केंद्रावर मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक सदस्यांची थर्मामिटरने तपासणी करून मगच आत प्रवेश दिला जात होता.