प्रतिनिधी , वर्धा : राजस्थान व छत्तीसगढ राज्याप्रमाणे महाराष्ट्रातील १ नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त सर्व विभागातील कर्मचाऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करावी.या मागणीसाठी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयाजवळ सायंकाळी निदर्शने केली आणि जर छत्तीसगड आणि राजस्थान सारख्या राज्यात जुनी पेन्शन योजना लागू होउ शकते तर महाराष्ट्र सरकारला काय समस्या आहे असा प्रश्न संघटनेच्या कार्यकर्त्यांनी विचारला, यावेळी जिल्हा सचिव प्रमोद खोडे, मंगेश भोमले,रितेश निमसडे,अश्विनी इंगोले,सीमा खेडकर,सिद्धार्थ शंभरकर,सुरेशकुमार बरे,मेरी साळवे,विपीन भोमले,नितीन खराबे,चंद्रकांत मुटकुळे यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते एकत्रित आले होते.
