प्रतिनिधी , छत्रपती शिवरायांच्या जयंतीला बंदी घातल्यानंतर या ठाकरे सरकारने राज्यामध्ये शिवरायांचे पोवाडे गायला सुद्दा बंदी घातली आहे. वर्षांनुवर्षं शिवजयंतीला पोवाडे गाणाऱ्या शिवशाहीर हेमंत राजे मावळे यांना आज अटक करण्यात आली. या राज्यात नुसती मोघलाई नसून मोघलांचे वारसच हे सरकार चालवत आहेत का असा प्रश्न आज उपस्थित झाला आहे आणि म्हणून या मुघलविकास आघाडी सरकारचा आम्ही जाहीर शब्दात निषेध करतो. अशी टीका भारतीय जनता पार्टी अध्यात्मिक आघाडी चे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.
