जनतेज न्युज

DYSP श्री सुधीर खिरडकर यांनी शिवजयंतीच्या जनतेस दिल्या शुभेच्छा.. तर प्रशासनाचे नियम पाळण्याचे अवाहन..

प्रतिनिधी , जालना : जालन्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधीर खिरडकर यांनी जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांनी सर्व जनतेस पोलिस दलातर्फे शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साजरी करत असताना प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे उल्लंघन होणार नाही याची सर्व जनतेने काळजी घ्यावी असे अवाहन केले.
या वेळी सदर बाजार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय देशमुख शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक यशवंत जाधव, API झलवार, व ईतर पोलीस कर्मचारी ऊपस्थित होते.