प्रतिनिधी , जळगाव : राज्यसरकार मधील अनेक नेते आणि मंत्री कोरोनाच्या संदर्भातील नियमांचे उलनघन करून मोठ्या संख्येने सभा मेळावे घेऊन गर्दी गोळा करीत आहेत आणि शिवजयंती साठी मात्र दहा जनांच्या वर एकत्र येता नाही,घरात बसून साजरी करा अशा प्रकारचा सल्ला ते जनतेला देत आहे हा विरोधाभास असलायने आपण त्याला विरोध केला होता ,मात्र राज्यभरात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पहाता शासकीय नियमांचे पालन करून आम्हीशिवजयंती ही साधे पणाने साजरी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे
आज शिवजयंती निमित्ताने जळगांव येथे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून झाल्यावर महाजन यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे,दर वर्षी गिरीश महाजन हे आपल्या जामनेर मतदारसंघात शिवजयंती निमित्ताने होणाऱ्या मिरवणुकीत सहभागी होऊन लेझीम खेळत असतात यंदा मात्र कोरोनाच्या मुळे साधे पानाने शिवजयंती साजरी करण्याचं आवाहन ही गिरीश महाजन यांनी केले आहे
कोरोनाच्या वाढत्या प्रसाराबाबत बोलताना त्यांनी हे राज्य सरकारच अपयश असल्याच म्हटलं आहे,सरकारने वेळीच कठोर उपाय योजना केल्या असत्या तर आज ही वेळ आली नसती अजूनही वेळ गेलेली नसल्याचं महाजन यांनी म्हटलं आहे
