जनतेज न्युज

वरणगाव पोलीस व शिवजन्मोत्सव समीतीचा वेगळा उपक्रम, रक्तदात्यांचा घोड्यावर बसून सन्मान .

प्रतिनिधी , जळगाव : भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे पोलीस ठाणे व शिवजन्मोत्सव समीतीचा च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती रक्तदान शिबीर घेवून साजरी करण्यात आली,
वरणगाव येथील भोगावती नदी तीरावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन पोलीस निरीक्षक संदीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला , यावेळी ज्या रक्तदात्यानी रक्तदान केले आहे त्या रक्तदात्याना फेटा बांधून घोड्यावर बसून सन्मान करण्यात आला , रक्तदान शिबीरा साठी परीसरतील शिवभक्त यांनी गर्दी केली आहे