जनतेज न्युज

राज्यात सध्या रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असून कोरोना काळात रुगणांना रक्ताचा तुटवडा होऊनये – प्रताप देशमुख

प्रतिनिधी , परभणी : राज्यात सध्या रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असून कोरोना काळात रुगणांना रक्ताचा तुटवडा होऊनये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जनतेस रक्तदान करण्याचे आव्हान केले, त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत परभणीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद चंद्रजी पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त माजी महापौर प्रताप देशमुख मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले . मोठ्या प्रमाणात यावेळी रक्तदात्यांनी रक्तदान केले.