प्रतिनिधी , जळगाव : भुसावळ येथे माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी पत्रकार परिषदेत घेतली यावेळी हंडोरे म्हणाले मागासवर्गीय जनतेला न्याय मिळाला पाहिजे. या सरकारच्या कालावधीमध्ये समाजकल्याण खात्याला मिळणारा निधी अनेक ठिकाणी वळवला गेला आहे. माझ्या काळातील ज्या योजना मी राबवल्या होत्या या योजना या सरकारने प्रभावीपणे राबवल्या नाहीत, मागासवर्गीयांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत यासाठी काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. मागासवर्गीयांना न्याय मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा प्रश्न आहे. समाज कल्याण विभागाला दिलेला निधी अन्य डिपार्टमेंटला वळवला जाऊ नये असे झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात यावी. असे मत माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांनी व्यक्त केले.
