प्रतिनिधी , मुंबई : शिवसेनेचा भगवा आता हिरवा झाला आहे त्यांना पुन्हा मुंबई महानगरपालिकेत सत्ता हवी आहे ज्या शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक भ्रष्टाचार केले मुंबईकरांच्या स्वप्नातील मेट्रो चे काम बंद केले त्या शिवसेनेला काय लोकांना लुबाडणे करिता पुन्हा मुंबई महानगर पालिकेत सत्ता हवी आहे का असा घणाघाती आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विधानानंतर केला आहे. महापालिके मधील महापौर एस आर ए च्या जागेवर कब्जा करतात तर महापालिकेचे नेते कॉन्ट्रॅक्टरला धमकावतात असे काम करण्याकरिता पुन्हा शिवसेनेला सत्ता हवी आहे का असा प्रश्न देखील किरीट सोमय्या यांनी विचारला आहे.
