प्रतिनिधी , नाशिक : औरंगाबादच्या नामकरणाच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि शिवसेनेतील संघर्षामुळे लवकरच राज्यातील सरकार कोसळणार असून देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असल्याचे भाकीत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. त्याचप्रमाणे सध्या अमेरिकेत सुरू असलेल्या सत्तासधाऱ्यांवरही त्यांनी भाष्य केले असून आपण या विषयावर डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संवाद साधणार असल्याचं त्यांनी सांगितले.
