जनतेज न्युज

राष्ट्रीय महामार्ग १२ किलो गांजा जप्त ; पाटणबोरी येथे कारवाई

प्रतिनिधी , यवतमाळ : पांढरकवडा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग पाटणबोरी जवळ पोलिस कर्मचारी पेट्रोलिंग करीत असतांना धाब्या जवळ तिन व्यक्ती संशयित दिसल्याने त्यांची चौकशी केली. त्यांच्याकडून १२ किलो गांजा तसेंच इतर साहित्य एकुण एक लाख तिस हजार रूपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उपस्थित पोलीसांनी सदर माहीती निरीक्षक रामकृष्ण महल्ले यांना दिली. त्यावेळी ठाणेदार महल्ले यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. पोलीसांनी आरोपी अंशु संजीवकुमार गुप्ता, अभय प्रतापसिंह रामनरेश सिंह, विजयसिंग जसवंतसिंह (रा. सर्व कलालगंज फर्रूखाबाद उत्तर प्रदेश ) यांना ताब्यात घेवून घेतले. या तीन्ही आरोपी विरूध्द विविध कलमान्वे गुन्हे दाखल केले असुन पुढील तपास पांढरकवडा पोलीस करीत आहे.