जनतेज न्युज

किसानबाग जनआंदोलना मार्फत शेतकरी विरोधी कायदे रद्द होणेबाबत वंचित बहुजन आघाडी धरणे आंदोलन …..

प्रतिनिधी , नंदुरबार : दिल्ली येथे देशातला शेतकरी न भुतो न भविष्यती असे आंदोलन करीत आहे. केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या काळात शेतीसंबंधी तीन नवीन कायदे चर्चा न करता संसदेत संख्या बळाच्या आधारावर मंजुर करुन घेतले. या नवीन विधेयकामुळे भारतीय शेतकरी अक्षरश: नागवला जाणार असून तो देशोधडीला लागणार आहे. जागतिकीकरण आणि त्यामागुन अपरिहार्यपणे येणाऱ्या खाजगीकरणातुन शेतकऱ्यांचा शेतमाल कवडी मोलाने विकत घेण्याची मुभा आणि त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या जमिनी गिळंकृत करण्याचा राजमार्ग या नवीन विधेयकात आहे. दिल्लीत शेतकरी आंदोलन सुरु आहे. त्याला पाठींबा म्हणून ज्याप्रकारे कॅब, एनआरसी राष्ट्रीय नागरिकत्व कायद्याविरोधात शाहीन बाग नवी दिल्ली येथे हजारो महिला, पुरुष यांनी एकत्र येवुन ऐतिहासिक असा लढा दिला त्या आंदोलनाला शिख बांधवांनी उत्स्फुर्त पाठींबा देत लंगर चालविले होते. आज हाच पंजाब व हरियाणातील शेतकरी मागील ६५ दिवसांपासून दिल्लीच्या सिमेवर जनआंदोलन करीत आहे. या आंदोलनाला पाठींबा दर्शविण्यासाठी अल्पसंख्याक मुस्लिम समुदायाच्या कर्तव्याचा भाग म्हणून किसानबाग या नावाने पाठींबा आम्ही सर्व व्यक्त करीत आहोत. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शेतकऱ्यांवर जो गोळीबार करण्यात आला त्यात एका शेतकऱ्यांचा बळी गेला असून त्या घटनेचा निषेध करीतत्या मृत शेतकऱ्यांच्या प्रती आम्ही संवेदना प्रकट करीत आहोत. व वरील तिन्ही शेतकरी विरोध काळे कायदे रद्द करा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी करत आहे व शेतकरी आंदोलनाला
सक्रीय पाठींबा देत आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण रामराजे,उद्धव पिंपळे ,नानासाहेब ठाकरे व कार्यकर्त उपस्थित होते ….