जनतेज न्युज

लातूर जिल्ह्यातील पानटपरी, चहाटपरी, जिम, मंगल कार्यालये, चित्रपटगृह, नाट्यगृह बंद

प्रतिनिधी , लातुर : लातूर जिल्ह्यातील वाढती कोरोनाबाधित रुग्णांची संख्या लक्षात घेऊन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी निर्बंध जारी केले आहेत. जिल्ह्यातील सर्व जिम, व्यायामशाळा, स्पोर्टस कॉम्प्लेक्स, स्विमिंग पूल, पार्वâ, पर्यटनस्थळे, पानटपरी, चहाटपरी, मंगल कार्यालये, चित्रपटगृह, नाट्यगृह, सभागृहे बंद करण्याचे आदेश जारी केले आहेत. हॉटेल, बार, परमिट रूम याठिकाणी फक्त पार्सल सुविधा राहणार असून लातूर जिल्ह्यात होळी, रंगपंचमी, धुलीवंदन आपल्या कुटुंबात स्वगृही साजरे करण्याचे आदेश दिले आहेत. २७ मार्च पासून या आदेशाची अंमलबजावणी जिल्ह्यात होणार आहे.
लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी लातूर जिल्ह्यात वाढत चाललेल्या कोरोनाधित रुग्ण संख्येमुळे काही अतिरिक्त निर्बंध लागू केले आहेत. लातूर जिल्ह्यातील सर्व जिम व्यायामशाळा, स्पोर्टस कॉम्प्लेक्स, योगा, नृत्यवर्ग, खेळाची मैदाने, सर्व क्रीडा प्रकारचे स्पर्धा, वैयक्तीक क्रीडा प्रकार सराव, स्विमिंग पूल, पार्वâ, अमूजमेंट पार्वâ, पर्यटनस्थळे, इतर करमणुकीची ठिकाणे पुर्णतः बंद राहतील. सर्व चित्रपटगृहे, व्हिडीओगृहे, नाट्यगृह, व्हिडीओ गेमपार्लर, प्लेयिंग कार्डरूम, मंगल कार्यालय, सभागृह बंद राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व बार, हॉटेल, परमिट रूम, रेस्टॉरंट या ठिकाणी बसून खाण्यास मनाई करण्यात आली असून फक्त पार्सल सुविधा उपलब्ध राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व पानशॉप, पानटपNया, चहाटपNया बंद राहणार आहेत. २९ मार्च रोजी साजरी होणारी होळी, धुलीवंदन, तसेच २ एप्रिल रोजी साजरी होणारी रंगपंचमी आपल्या कुटुंबात स्वगृही साजरी करण्यात यावी. अ‍ॅटोरिक्षामध्ये दोन प्रवासी तसेच खाजगी टॅक्सी, काळीपिवळी जिपमध्ये वाहनचालकासह पाच प्रवासी याला मान्यता आहे. खाजगी बसेस, एसटी बस, शहर वाहतूक बस मध्ये ‘नो मास्क, नो एन्ट्री’ नियमानुसार प्रवासी बसू शकतील इतकेच प्रवासी प्रवास करू शकतील. २७ मार्च पासून निर्बंधाची अंमलबजावणी होणार आहे.