प्रतिनिधी, सोलापूर : वळसंग येथे दोन गटात दगडफेक आणि लाठी काठीने मारहाण.दोन्ही गटातील मिळून 71 जणांवर गुन्हे दाखल.19 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात अन्य आरोपींचा शोध सुरू.यासीन कटरे आणि मोहसीन तांबोळी यांच्या दोन गटात मारामारी , दगडफेक प्रकरणी 71 जणांवर गुन्हा दाखल तर 19 आरोपींना अटक करण्यात आली आहे.तू माझ्याकडे का बघतोस म्हणून काल सायंकाळी वळसंगी येथे दोन जमावाने एकमेकांवर दगडफेक करत लाठी काठीने मारहाण केल्याची घटना घडली होती.या प्रकरणी 71 जनांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत 19 आरोपींना अटक करण्यात आले आहे.अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती वळसंग पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांनी दिली आहे.
