जनतेज न्युज

वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना;घटनास्थळी काही काळ तणाव

प्रतिनिधी ,चंद्रपूर : केरकचरा टाकण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले ही घटना गुरूवार 03 डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील उत्तर वनपरिक्षेत्र अंतर्गत येणार्‍या डोर्ली (चिचगाव) येथे घडली
तारा विश्‍वनाथ खरकाटे असे मृतक महिलेचे नाव आहे घटनेची माहिती वनाधिकार्‍यांना मिळाली असता वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले ग्रामस्थांनी वाघाचा तातडीने बंदोबस्त करा जंगल व्याप्त गावाशेजारील झाडे झुडपी तोडून परिसर स्वच्छ करावा मृतक कुटुंबियांच्या वारसास आर्थिक मदत द्यावी अशी मागणी रेटून धरली त्यामुळे काही काळ घटनास्थळावर तणाव निर्माण झाला होता दरम्यान जमावाला पांगविण्यासाठी ब्रम्हपुरी पोलिसांना पाचारण करण्यात आले पोलिसांनी जमावाला शांत केले वनाधिकार्‍यांनी ग्रामस्थांच्या मागण्या मान्य केल्यानंतर तणाव निवळला घटनास्थळी ब्रम्हपुरी पोलिस पोलिस निरीक्षक,वनपरिक्षेत्र अधिकारी,क्षेत्र सहाय्यक घटनास्थळी उपस्थित होते