जनतेज न्युज

सोलापूर-दिल्ली शेतकरी आंदोलनास पाठिंबा देणाऱ्या माजी आमदार आडम मास्तर अन् कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक

प्रतिनिधी , सोलापूर : नरेंद्र मोदी मुर्दाबाद,तानाशाही नही चलेगी असं म्हणत सोलापुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
अखिल भारतीय किसान सभा आणि अन्य शेतकरी संघटनेच्या वतीने दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
यावेळी रास्तारोको आंदोलकांसह माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
माजी आमदार कॉ.नरसय्या आडम आणि सिटूचे राज्य महासचिव ऍड.एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील गेंटयाल चौक येथे रास्तारोको करण्यात आला.
या आंदोलनास सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ,एस.एफ.आय. तसेच सिटू प्रणीत अन्य संघटीत-असंघटीत कामगार संघटनांचे प्रतिनिधी कार्यकर्ते मोठ्या संख्येने पाठींबा देण्यासाठी आंदोलनात सहभागी झाले होते.यावेळी माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांच्यासह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.