जनतेज न्युज

वाढीव बिलं माफ करा, चिपळूणात बहुजन आघाडी च कंदील आंदोलन

प्रतिनिधी , चिपळूण : कोविड काळात आलेली भरमसाठ वीज बिल माफ करा अशी मागणी करत आज चिपळूणमध्ये वंचित बहुजन आघाडी ने अनोखे मेणबत्ती आणि कंदील आंदोलन केले
कोविड संसर्ग काळातील सात महिन्यांमध्ये मिटर रिडींग घेतलं नसल्याने सर्वांनाच एवरेज नुसार वाढीव बिल आली, या बिलाचा आकडा फार मोठा असून तो सर्वसामान्यांना न परवडणारे आहे म्हणूनच ही वाढीव बिल माफ करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केली
त्यांच्याच मार्गदर्शनानुसार चिपळूणमध्ये वंचित बहुजन आघाडी ने मेणबत्ती व कंदील आंदोलन केलं
चिपळूणच्या महावितरण कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आलं
वेळेला जिल्हाध्यक्ष महेश सावंत
यांनी याविरोधात महाराष्ट्र शासनाचा निषेध नोंदवला
आंदोलनानंतर आंदोलनकर्त्यांनी वीज बिलांची होळी करत महावितरण आणि महाराष्ट्र शासनाविरोधात घोषणाबाजी केली
महावितरणचे अभियंता लवेकर यांच्याकडे निवेदन देऊन मागणी मागण्या मान्य करण्याची विनंती करण्यात आली