प्रतिनिधी ,पुणे :ॲट्रॉसिटीकायदावाचन_आंदोलन कायदेशीर बाबींना अनुसरून जातीय अत्याचाराच्या संदर्भामध्ये तपास करण्यात यावा. जातीय अत्याचाराचा प्रकार हा अतिशय दर्जाच्या वरिष्ठ अधिकार्याकडूनच केला जातो. कायद्यामध्ये तशी जाणीवपूर्वक तरतूद केलेली आहे व तिचे पालन करणे आवश्यक आहे.
पण अनेक प्रकरणांमध्ये असे होताना दिसत नाही. त्यामुळे जातीय अत्याचार करणाऱ्यांना कायद्याचा धाक राहत नाही.
हे सर्व का होतं ? पोलिसांना कायदा कळत नाही का ? की कायदा करून त्यांना त्याची अंमलबजावणी करायची नाही ? या प्रश्नांचे उत्तर मिळून घेण्यासाठी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने ॲट्रॉसिटी कायदा वाचन आंदोलन करण्यात येणार आहे हे आंदोलन 4 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता पुणे पोलीस आयुक्त कार्यालय पुणे येथे होणार आहे.
