जनतेज न्युज

शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट घडत असते, भाजपा राज्यातलं सरकार पाडणार नाही, ते त्यांच्या कर्मानेच पडेल:-माजी कृषीमंत्री

प्रतिनिधी , अमरावती:- शरद पवार जे बोलतात त्यांचं नेमकं उलट होत असते, तसाच अर्थ आम्ही पण घेत असतो, त्यांच्यामध्ये साशंकता आहे की भारतीय जनता पक्ष महाविकास आघाडीत सरकार पाडणार नाही पण त्यांच्या त्यांच्या मधला एक घटक पक्ष बाजूला होऊन ते स्वतःच्या कर्मानेच सरकार पडेल, याबद्दलचा निश्चितपणे विश्वास शरद पवारांच्या मनामध्ये आहे, म्हणून ते म्हणतात की, भाजप महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात यशस्वी होणार नाही, असा टोला राज्याचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांनी लावला.