प्रतिनिधी ,अमरावती- अमरावती जिल्ह्यातील पिंगळखुटा येथील जवान कैलास दहीकर यांचा कर्तव्यावर असतांना कुलू मनालीत मृत्यू झाला होता.त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर आलेला आघात पाहून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपला खासदारकीचा 2 लाख 51 हजार रुपयांचा पगार शहीद कैलास दहीकर यांच्या कुटुंबाला दिला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सैनिक कैलास यांच्या आई, वडील व पत्नीला हा धनादेश अमरावतीत एका कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आला. शहीद कैलास दहीकर यांचा कर्त्यव्यावर असताना मृत्यू झाला, मात्र राजकीय नेत्यांनी त्यांच्या अंत्यसंस्कारात जाऊन केवळ भाषणबाजी करून दुःख व्यक्त केलं पण कोणीही त्या कुटुंबाला आर्थिक मदत केली नव्हती.मात्र, खासदार नवनीत राणा यांनी यात पुढाकार घेत आपला तीन महिन्याचा पगार सैनिकाच्या कुटुंबाला दिला,तर पुढील माझा सर्व पगार हा शेतकऱ्यांना दिला जाईल अशी घोषणा खासदार नवनीत राणा यांनी केली.
