जनतेज न्युज

शहरात माझी वसुंधरा अभियानांतर्गत भव्य सायकल रॅली,रॅलीत प्रशासन व शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी.

प्रतिनिधी ,धुळे : शहरातील वाढते प्रदूषण रोखण्यासाठी व कोरोनासारख्या भीषण संसर्गाशी सामना करण्यासाठी धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे महसूल प्रशासन,शिरपूर वरवाडे नगर परिषद व पंचायत समितीतर्फे आज गुरुवार दि.24 डिसेंबर रोजी शहरात माझी वसुंधरा अभियानांतर्गत भव्य सायकल रॅली आयोजित करण्यात आली. शिरपूर शहरातील सर्व सरकारी कार्यालयात यापुढे दर बुधवारी सायकलीवर येण्याचे आव्हान करण्यात आले.

व्हीवो : शहरात स्वयंचलित वाहनांच्या वाढत्या प्रमाणामुळे प्रदूषणचे प्रमाण वाढत  आहे. त्यातून निर्माण होणार्‍या आरोग्याच्या समस्या टाळण्यासाठी सायकलसारख्या प्रदूषणमुक्त वाहनांचा वापर वाढविण्या च्या हेतूने शिरपूर शहरात प्रांताधिकारी कार्यालय, डीवायएसपी कार्यालय, तहसील कार्यालय, नगरपरिषद कार्यालय, पोलीस स्टेशन,पंचायत समिती सह शहरातील विविध राजकीय, सामाजिक,सांस्कृतीक संघटना,युवक मंडळे, व्यापारी संघटना, व्यावसायिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शिरपूर शहरातून भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.सदर रॅली ही सकाळी आठ वाजता तहसील कार्यालयातून सुरू होऊन शहरातील मुख्य रस्त्यावरून शिरपूर नगरपरिषद कार्यालयात रॅलीचा समारोप करण्यात आला
      रॅलीत उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने, तहसीलदार आबा महाजन, नगरपालिका मुख्याधिकारी अमोल बागूल,जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ तुषार रंधे,शिरपूर सायकल क्लब आणि शहरातील विविध संघटनांचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते