प्रतिनिधी , धुळे : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील नवी अंतुर्ली शिवारात गावातील एका सहा वर्षीय बालकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची घटना दि.२३ डिसेंबर रोजी सायंकाळी उशिरा उघडकीस आली आहे. भरदुपारी बालकाची हत्या झाल्याचे उघडकीस आल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच तालुका व जिल्ह्यातील तपास यंत्रणा रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी दाखल झाल्या.
मोहित दिनेश ईशी वय ६ रा.अंतुर्ली असे हत्या झालेल्या बालकाचे नाव आहे. मोहित हा गावातील एका शेतात मजुरीसाठी गेलेल्या आई सोबत गेला होता.
कोरोनामुळे शाळा बंद असल्याने मोहितला घरी एकटे सोडण्याएवजी आई सौ.ज्योती दिनेश ईशी यांनी मुलाला शेतात सोबत घेऊन गेली होती .मुलाला बांधावर बसऊन शेतात निंदनी करत असताना आपला मुलगा शेतात दिसत नसल्याचे लक्षात आलेवर सर्वत्र शोध घेत असताना सायंकाळी एका शेतात मुलगा मृत अवस्थेत आढळून आला. शिरपूर पोलिसांनी तपासाची चक्रे तात्काळ फिरवित शेता शेजारील एक 13 वर्षीय अल्पवयीन मुलगा व मयत मोहित यांच्यात बोरं तोडणे वरून आपसात भांडण झाल्याने रागाच्या भरात तेरा वर्षीय अल्पवयीन मुलाने मोहितवर दगडाने वार करून खून केल्याची कबुली दिली.
बोरं तोडण्यावरून वादात एक अल्पवयीन मुलगा दुसऱ्या अल्पवयीन मुलाचा जीव घेऊ शकतो हे भयावह असल्याने मुलांना या वयात एवढा राग अनावर होणे हे फार धक्कादायक चित्र आहे.
